शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 8 मार्च 2023 (09:57 IST)

Bleaching Side Effects स्वच्छ त्वचेसाठी तुम्ही ब्लीच करत असाल तर हे नुकसान जाणून घ्या

हल्लीच्या इंस्टंट काळात सर्वांना कोणत्याही गोष्टी चा परिणाम हा झटपटच हवा असतो. सौंदर्याच्या बाबतीत देखील झटपट परिणाम मिळविण्यासाठी विविध प्रकारचे सौंदर्य उत्पादने वापरले जातात. अशात त्वचा स्वच्छ आणि टोन्ड अप दिसण्यासाठी महिला ब्लीचचा वापर करतात. खरं म्हणजे याने केस हलके होऊन त्वचा उजळ होते. ब्लीचमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड असते, जे ब्लीचिंग एजंट आहे. हे केसांना हलके करतंं ज्यामुळे त्वचा उजळ दिसते. पण तुम्हाला माहित आहे का की हे ब्लीच त्वचेसाठी खूप धोकादायक ठरु शकतंं आणि याचे अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. तर चला ब्लीच करण्याचा विचार असेल तर त्यापूर्वी त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या- 
 
मेलेनिनची कमतरता- ब्लीच थेट त्वचेवर लावल्याने त्वचा उजळ होत नसून त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन कमी होते. अशात जेव्हा त्वचेमध्ये मेलेनिन कमी होते तेव्हा त्वचेवर डाग दिसू लागतात. तरी चेहरा झटपट उजळ दिसण्यासाठी ब्लीच उपयुक्त आहे, हे मात्र खरे आहे. परंतु याचा वापर तुमची नैसर्गिक चमक दूर करतंं .
 
त्वचेेेच ऍलर्जी- ब्लीचिंगमुळे त्वचेची अॅलर्जी होण्याची शक्यता वाढते. कारण ब्लीचमध्ये केमिकल्स असतात जे तुमच्या त्वचेला नुकसान करु शकतात. काही महिलांना ब्लीच लावल्यानंतर त्वचेवर जळजळ, खाज सुटणे, लाल ठिपके आणि सूज येणे अशा तक्रारी होतात.
 
डोळ्यांसाठी हानिकारक- ब्लीचमुळे केवळ त्वचा नाही तर डोळ्यांच्या आरोग्यास देखील नुकसान होते. वास्तविक ब्लीचिंग एजंट्सना अनेकदा तीव्र वास येतो. ब्लीचिंग करताना डोळे बंद ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण याने डोळ्यात जळजळ, लालसरपणा किंवा पाणी येण्याची समस्या उद्भवते.