रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 1 मे 2023 (13:55 IST)

benefits of glycerin in summer उन्हाळ्यात ग्लिसरीनचे फायदे जाणून घ्या

उन्हाळा वेगाने वाढत आहे. उन्हात बाहेर पडणे त्वचेसाठी खूप धोकादायक आहे. त्वचा कोरडी व निर्जीव होण्यास सुरवात होते. एवढेच नव्हे तर  रंगही काळा पडू लागतो. परंतु ग्लिसरीन त्वचेच्या या सर्व समस्यांवर उपाय आहे.
ग्लिसरीनचा वापर आपण  थंडीत त्वचेची काळजी घेण्यासाठी करत होतो . परंतु उन्हाळ्यात देखील हे प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊ की उन्हाळ्यात ग्लिसरीन आपल्या त्वचेला मऊ आणि उन्हापासून कसे संरक्षण करते-
 
1. ग्लिसरीनचा वापर केल्याने आपल्या चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर होतात.  तसेच, चेहऱ्यावर दिसणाऱ्या रेषाही संपतात. आपण आंघोळ केल्यावर त्याचा वापर करू शकता.
 
2. ग्लिसरीन जरी चिकट असत. परंतु ते सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करत. आपणास हवे असल्यास आपण या मध्ये पाण्या ऐवजी गुलाबाचे पाणी देखील मिसळू शकता. यामुळे आपला चेहरा चमकत राहील.
 
3 मऊ आणि क्रिस्टल क्लियर त्वचेसाठी  दररोज रात्री फेसवॉश करून ग्लिसरीन लावून झोपा सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. आपली त्वचा खूप मऊ आणि क्रिस्टल क्लियर होईल.
 
4 ग्लिसरीन लावून जर तुम्हाला गरम वाटत असेल तर तुम्ही ते फक्त रात्रीच लावावे. दिवसात  मॉइश्चरायझर लावा. आपण दररोज रात्री कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावून झोपू शकता. या मुळे गडद वर्तुळे होण्यास देखील आराम मिळतो. 
 
5  या मध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात जे आपला चेहरा स्वच्छ करतात. तसेच तेलकट त्वचेच्या स्त्रियांनी हे फक्त क्लिन्झर म्हणूनच वापरावे. कारण तेलकट त्वचा मुरुमांना वाढवतात.