बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (08:41 IST)

Beauty Advice : चंदनाने दूर होईल टॅनिंग, असा बनवा फेस पॅक

Sandalwood Face Pack
चंदनाची पेस्ट त्वचेला थंडावा प्रदान करते. त्वचेला मॉइस्चराइज करण्यासाठी चंदन फायदेशीर असते. चंदनाची पेस्ट टॅनिंग दूर करते. 
 
Sandalwood Face Pack : उन्हाळा आला की त्वचेवर विशेष लक्ष द्यावे लगते. सूर्याचे प्रखर किरणे त्वचेवर परिणाम करतात. ज्यामुळे त्वचा खराब होते. ज्यांची त्वचा लवकर टॅनिंग होते, त्यांनी त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. या समस्येपासून आराम मिळण्यासाठी चंदनाचा लेप हा एक नैसर्गिक उपाय आहे.
चंदनाचा लेप एक नैसर्गिक उपाय असून हजारो वर्षापासून त्वचेसाठी उपयोग केला जात आहे. चंदनाचा लेप लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. व उष्णतेपासून आराम मिळतो. चला जाणून घेऊ या चंदन फेस पॅक कसा वापरावा. 
 
चंदनाचा एक तुकडा बारीक करून घ्यावा. आता यात दूध किंवा दही मिक्स करा. एक मऊ पेस्ट बनेल. आता या पेस्टला चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. त्या नंतर 15 ते 20 मिनिटांनी धुवून टाकावे व चेहऱ्याला टॉवेलने पुसून घ्यावे. नंतर मिठाच्या पाण्याने परत धुवावे. तुम्ही बाजारात मिळणाऱ्या चंदन पॉवडरचा देखील उपयोग करू शकतात. 
 
Sandalwood Face Pack Benefits : चंदनाचे फायदे 
1. चंदन त्वचेला थंडावा प्रदान करते. तसेच उष्णतेपासून आराम मिळतो 
2. चंदनाचा लेप त्वचेला मॉइस्चराइज करतो आणि त्वचेला मौ , सुंदर ,चमकदार बनवतो . 
3. चंदनात अँटी-इंफ्लेमेट्री गुण असतात जे त्वचेचे सूजने कमी करून आरोग्यदायी ठेवतो. 
4. चंदनाचा लेप त्वचेला सूर्याच्या किरणांच्या प्रभावपासून वाचवतो व टॅनिंग कमी करतो.  

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik