Holi 2024:गुलाबी ओठांची होळी मध्ये अशा प्रकारे घ्या काळजी
होळी रंगांचा सण आहे. यादिवशी सगळे एकमेकांना रंग लावतात. काही जण रासायनिक रंगांनी होळी खेळतात. या रंगांमुळे केसांना आणि त्वचेला नुकसान होतात. तर या रासायनिक रंगांमुळे ओठांना देखील त्रास होतो. काही जणांचे ओठ देखील या होळीच्या रंगात खराब होतात. ओठांची त्वचा खूप मऊ असते. हानिकारक रंगांमुळे ओठांची त्वचा खराब होते. काही टिप्स अवलंबवून आपण होळीच्या रासायनिक आणि हानिकारक रंगापासून ओठांची काळजी घेऊ शकता.
लिपबाम लावा
होळी खेळण्यापूर्वी आपण ओठांना लिपबाम लावू शकता जेणे करून हानिकारक रंगापासून ओठांचे संरक्षण होऊ शकेल.
व्हॅसलिन लावा -
हानिकारक रंगापासून ओठांना सुरक्षित ठेवण्यासाठी पेट्रोलियम जेली व्हॅसलिनचा वापर करू शकतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील व्हॅसलिनचा वापर करू शकता. होळी खेळण्यापूर्वी ओठाना भरपूर पेट्रोलियम जेलीच्या व्हॅसलिन लावा जेणे करून होळीच्या हानिकारक रंगांमुळे ओठ खराब होणार नाही.
या गोष्टी लक्षात ठेवा
* रंग खेळून झाल्यावर रंग काढण्यासाठी त्वचेला घासून स्वच्छ करू नका.
* रंग स्वच्छ केल्यावर त्वचेला मॉइश्चराइजर लावा.
* फेसपॅकचा वापर करा.
* रंग स्वच्छ करण्यासाठी कपडे धुण्याचा साबण वापरू नका.
* गडद रंग काढण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका.
* स्क्रबरचा वापर करू नका.
* रंग स्वच्छ करण्यासाठी नेहमी मऊ साबण वापरा.
Edited by - Priya Dixit