1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

पायांची सुंदरता वाढवेल टूथपेस्ट पेडिक्योर, जाणून घ्या पद्धत

प्रत्येक महिलेचे स्वप्न असते की मी सुंदर दिसावे. चेहरा सुंदर दिसण्यासाठी महिला पार्लरच नाही तर घरगुती उपाय देखील करतात. तसेच गोष्ट जर पायांची असले तर अनेक महिला पायांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे पायांची त्वचा कोरडी होते तसेच रुक्ष आणि काळवंडते. तर अनेक महिला पायांची सुंदरता वाढवण्यासाठी पार्लरमध्ये महाग पेडिक्योर करतात. ज्यामुळे त्वचा चमकदार बनते पण जास्त काळ टिकत नाही. जर तुम्हला विना पैसे खर्च करता घरीच पायांना पेडिक्योर करायचे असेल तर जाणून घ्या पद्धत 
 
1 मोठा चमचा टूथपेस्ट 
1 मोठा चमचा गुलाब जल 
1 मोठा चमचा तांदळाचे पीठ 
1 मोठा चमचा एलोवेरा जेल 
1 जुना ब्रश 
 
जाणून घ्या पद्धत 
एका वाटीमध्ये टूथपेस्ट घ्यावी. त्यामध्ये गुलाबजल, तांदळाचे पीठ, एलोवेरा जेल मिक्स करून एक पेस्ट तयार करावी. या पेस्टला पायांना लावावे. कमीतकमी 5 मिनिट टूटब्रशने पायावर स्क्रब करावे. व नंतर पायांना कोमट पाण्यात भिजत ठेवावे. मग पायांना टॉवेलने स्वछ पुसावे. त्यानंतर शुद्ध तुपाने पायावर मसाज करावा. असे केल्यास घरीच पायांना तुम्ही पेडिक्योर करू शकतात. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि मऊ होईल.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik