रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

जळत्या निखार्‍यांवर चालण्याची परंपरा

WD
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही मध्य प्रदेशातील माळव्याच्या आदिवासी भागातील अनोख्या चूल प्रथेविषयी माहिती देणार आहोत. होळी दहनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच धुळवडीला माळव्यातील आदिवासी भागात हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. या प्रथेअंतर्गत महिला वडाची पूजा करतात. त्यानंतर धगधगत्या निखार्‍यावर चालतात. सुरवातीला महिला सती देवी आणि गळ देवता यांच्याकडे नवस करतात. आणि नवस पूर्ती झाल्यानंतर लागोपाठ पाच वर्षे जळत्या निखार्‍यांवर चालून देवाचे आभार व्यक्त करतात.

तीन ते चार फूट लांब आणि एक फूट खोल खड्ड्यात जळते निखारे ठेवले जातात. त्यावर तूप टाकले जाते. त्यामुळे निखार्‍यांवरील आग भडकते. त्यानंतर मग या महिला त्यावर चालतात. धुळवडीच्या दिवशी सकाळपासून ही प्रथा सुरू होते. आणि सूर्यास्तापर्यंत महिला अग्निपथावरून चालत राहतात.

WD
यातील एका महिलेने आपल्या मोठ्या भावाचे लग्न आणि मुलासाठी येथे नवस केला होता, असे सांगितले. भावाचे लग्न होऊन या वर्षीच मुलगा झाल्याने त्या नवस फेडण्यासाठी येथे आल्या होत्या. नवस फेडण्याचे हे पहिलेच वर्ष असून पुढील चार वर्षे लागोपाठ येऊन या निखार्‍यांवर चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथे आलेल्या महिलांना त्यांचा नवस पूर्ण होईल याची खात्री होती. जळत्या निखार्‍यांवर चालल्यानंतरही अजिबात चटके बसत नाहीत, असे गेल्या तीन वर्षांपासून निखार्‍यांवर चालणार्‍या शांतीबाईने सांगितले.

या विचित्र प्रथेमागेही एक कथा आहे. राजा दक्षाने सती मातेचा अपमान केल्याने तिने अग्निकुंडात उडी घेतली. या सतीमातेकडेच महिला नवस करतात. जळत्या निखार्‍यांवरून चालतानाही तिचेच स्मरण करतात. या विचित्र प्रथेविषयी तुम्हाला काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....