काळया मशिदीचा ''सरदार''
|
देवास शहराच्या स्मशानभूमीजवळ एका अज्ञात बाबाची कबर आहे. काली मशीद म्हणून ती या भागात प्रसिध्द आहे. दूरवरून भूतबाधित लोक येथे येतात आणि नवस करतात. काही वर्षांपूर्वी येथून नागधम्म नावाची नदी वाहत होती मात्र त्या नदीचे सद्या गंध्या नाल्यात रुपांतर झाले आहे.
|
मशिदीचा सेवक अर्जुनसिंहकडून याबाबत माहिती घेतली असता त्याने सांगितलं, की कोणतीही व्यक्ती येथे येऊन पाच गुरुवार बाबांची मनोभावे सेवा करील ती सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त होईल. केवळ भूतप्रेतांपासून मुक्तीच नव्हे तर अनेकांच्या इच्छाही बाबांच्या कृपेने पूर्ण झाल्या आहेत. त्यांच्या आशीर्वादानं अनेक अंधांना दृष्टी मिळाली तर अनेकांना अपत्य प्राप्ती झाली आहे.
|
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणार्या विज्ञानाच्या युगात भूत-प्रेत ही एक भ्रामक कल्पना असल्याचे मानले जाते. त्याचवेळी इथं आलेले शेकडो लोक मात्र आपल्या श्रद्धेशी घट्ट चिकटून बसलेले असतात.
