शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

नई माता मंदिर

WD
श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर जिल्ह्यातील बिरोदाबाद गावातील नई माता मंदिराविषयी माहिती देणार आहोत.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आल्यानंतर कोणताही रोग बरा होऊ शकतो. आजार शारीरिक असो वा मानसिक किंवा भूतबाधेसारखे प्रकार. येथे आल्यानंतर सगळे आजार बरे होतात.

WD
या मंदिरातील देवीचे पाच मंगळवारी दर्शन घेतल्यानंतर आलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते अशी येथे येणाऱ्या भाविकांची धारणा आहे.
इथे येणाऱ्या भक्तांनाही विचित्र समजूतींवर विश्वास ठेवायला भाग पाडले जाते. पांढरा कपडा वापरला म्हणजे देवीचा कोप होतो, काळा कपडा अपशकुनी आहे. प्रेतयात्रेत सहभागी झाल्याने रोग वाढतो. इतकेच काय जेवणातही पांढऱ्या रंगाचा पदार्थ खाल्ल्याने देवीचा कोप होतो अशी येथे येणाऱ्या भाविकांची समजूत करून दिली जाते.

देवीच्या नावावर या मंदिराजवळच सबजन बाई नामक एका महिलेने स्वतः:चे दुकान थाटले आहे. आपल्या शरीरात देवीचा संचार होतो. कोणत्याही रोग्याला आपण बरे करू शकतो. असा तिचा दावा आहे. या बाई भूतबाधा उतरविण्याचा दावाही करतात. असे अनेक दावे करतानाच सबजन बाई तिच्याकडे येणाऱ्या भाविकांना धमकावतेही, ‘खबरदार डॉक्टरकडे जाल तर, रूग्णाचा मृत्यू होईल’.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....