शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

बालापीरचा दर्गा

- अल्केश व्यास

श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला गुजरातमधील बालापीरच्या दर्ग्यात घेऊन जाणार आहोत. हा दर्गा साधासुधा नाहीये. भाविकांनी काहीही मागितलं तरी ते मिळतं, तेही अगदी वेळेत. त्यामुळेच बालापीरचे बाबा नवसपूर्तीच्या बाबतीत अगदी वक्तशीर असल्याचा लौकीक आहे.

WDAlkesh

मुंबई- अहमदाबाद हायवेवर नंदेसरी गावाजवळ बालापीरचा दर्गा आहे. या दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे नवसपूर्ती झाली की लोक बाबांना घड्याळ वाहतात. इतर कुठल्याही दर्ग्यात असं चित्र दिसत नाही. याचं कारण एकच, बालापीरच्या बाबांचा वक्तशीरपणा.

WDAlkehs

या दर्ग्यात पोहोचल्यानंतर अनेक लोक बाबांना घड्याळ वाहताना आम्हाला दिसले. त्या सगळ्यांच्या इच्छा बाबांनी पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे आपला नवस फेडण्यासाठी ते इथं आले होते.


WDAlkesh

या दर्ग्याची देखरेख एका हिंदू कुटुंबाकडे आहे. त्यांच्या मते बाबांसमोर व्यक्त केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते. तीही अगदी वेळेत. हे ठिकाण हायवेवर असल्यानं अनेक ट्रक चालकही दर्ग्यात डोकं ठेवायला येतात. आपल्या नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचू दे अशी मागणी ते बाबांकडे करतात.
WDAlkesh


इथं नवस करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आपल्या नवसाची पूर्ती होईल, अशी खात्री असते. त्यामुळे बाबांच्या दरबारात घड्यांळांची रास लागते. या सगळ्या प्रकाराविषयी आपल्याला काय वाटतं, ते आम्हाला जरूर कळवा.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा......