मोबाईलवाला गणपती
|
धावपळीच्या या युगात भक्तांना देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाण्यासाठी वेळ नाही. अशा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा इंदौर येथील जूना चिंतामण गणेश नेहमी भक्तांशी मोबाईल फोनवरून संवाद साधत असतो.
|
चिंतामणी गणेश मंदिरात येणाऱ्या भक्तांचे म्हणणे आहे की, चिंतामण गणेश मोबाईल फोनवरून अथवा पत्रांच्या माध्यमातून मनोकामना व समस्यांचे निवारण करतात.
|
आपला यावर विश्वास बसत असो अथवा नसो मात्र हो सत्य आहे की, चिंतामण गणेश भक्तांच्या समस्या फोनद्वारे जाणून घेतात व त्यांना उत्तर पाठवतात. तसे पाहिले तर भारतात श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील रेषा इतकी अस्पष्ट झाली आहे की, ती नागरिकांना दिसतच नाही. आता आपल्याच ठरवायचे आहे की, चिंतामण गणेश मोबाईल फोनवरून भक्तांची मनोकामना पूर्ण करत असेल आम्हाला जरूर कळवा....
