शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

शापित पाषाणनगरी

WD
श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला एका शापित गावात घेऊन जात आहोत. प्राचीनकाळी राजा गंधर्वसेनच्या शापामुळे हे गाव पाषाणात परिवर्तीत झाले होते.

गावातील प्रत्येक वस्तू दगड बनली होती. कालांतराने हे गाव जमिनीत गाडले गेल्याची अख्यायिका आहे. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील सोनकच्छ तालुक्यात गंधर्वपुरी नावाचे हे गाव आहे. हे गाव बुद्धकालीन इतिहासाचे साक्षीदार मानले जाते. गावाचे नाव आधी चंपावती नगरी होते. कालांतराने ते गंधर्वपुरी झाले.

WD
गंधर्वसेन हे महान सम्राट विक्रमादित्य आणि भर्तृहरी यांचे पिता होत. येथील स्थानिक निवासी कमल सोनी म्हणतात, की ही फार प्राचीन नगरी आहे. येथे आजसुद्धा ज्या जागेत खोदकाम केले जाते तेथे प्राचीन दगड सापडतात.

या नगरीच्या राजाच्या मुलीने त्यांच्या इच्छेविरूद्ध गंधर्वसेनशी लग्न केले होते. गंधर्वसेन दिवसा गाढवाच्या वेशात रहात असे. रात्र झाल्यावर गाढवाची कातडी काढून सुंदर राजकुमारच्या वेशात येत. राजाला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने आपल्या दासीला सांगितले, की गंधर्वसेन गाढवाची कातडी काढेल तेव्हा ती जाळून टाका. पण असे केल्याने गंधर्वसेनसुद्धा जळायला लागला आणि वेदनेने व्हिव्हळताना त्याने राजासहित संपूर्ण नगरीला शाप दिला. हे नगर निर्जीव दगड बनेल, असा तो शाप होता.

या विषयी आम्ही सरपंच विक्रमसिंह चौहान यांच्याकडूनही माहिती घेतली. त्यांनी या आख्यायिकेला पुष्टी दिली. ते म्हणाले, हे खरे आहे आणि या गावाच्या खाली एक जुनी शापित नगरी दबलेली आहे. येथे हजारो मुर्ती आहेत.

येथून आजही बुद्ध, महावीर, विष्णू या देवतांव्यतिरिक्त मूर्ती दिसतात. जवळपास 300 मूर्ती येथे असलेल्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. तरी देखिल बर्‍याचशा मूर्ती गायब झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....