शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

स्त्रियांच्या पोटात का नाही राहत गुपित

हे तर सगळ्यांनी ऐकले असेल की स्त्रियांच्या पोटात कोणतीही गोष्ट गुपित राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरी स्त्री मनात गुपित ठेवूच शकत नाही. असे का?



पुढे वाचा यामागील कारण काय?

यामागील पौराणिक कारण असे आहे की स्त्रियांना युधिष्ठिर यांचा शाप आहे. महाभारतात वर्णित आहे की कुंतीला हे माहीत असताना की कर्ण तिचाच पुत्र आहे तिने हे सत्य इतर लोकांपासून लपवून ठेवले. जेव्हा हे गुपित पांडव पुत्रांना कळले तेव्हा तिच्या ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर यांनी शाप दिला की आपण ही गोष्ट लपवून ठेवली म्हणून मी शाप देतो की यापुढे दुनियेतील कोणतीही स्त्री आपल्या पोटात गुपित पचवू शकणार नाही. मनावर कितीही ताबा ठेवला तरी ती सत्य बोलून देईल. म्हणूनच स्त्रिया आपल्या पोटातील गुपित उघड करतात.