माधव शिरवळकर हे नाव मराठी वाचकाला विशेषतः तंत्रज्ञानविषयक वाचकाला नवे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विविध वर्तमानपत्रात त्यांचे लिखाण येते आहे. लोकसत्तात गाजलेल्या संगणक जगत या सदराचे लेखक ते हेच. याशिवाय समग्र राम गणेश गडकरी हे मराठीतील पहिले ई- बुकही त्यांनी प्रकाशित केले. त्यानंतर केशवसुत, लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र स्मृतिचित्रे यासह सुमारे...