Daily Horoscope
✕

Price Hike From 1st October: 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीन महाग होणार

Updated: मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 (10:26 IST)
ALSO READ: तीन दिवसांचा बँक संप स्थगित, सर्व बँका वेळेवर पुन्हा सुरू
 
देशात सणासुदीचा काळ सुरू होणार आहे आणि विशेषतः दिवाळीसाठी लोक आपल्या घरासाठी नवीन वस्तू खरेदी करतात. यामध्ये टीव्ही, रेफ्रिजरेटर, एसी आणि इतर घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होतो, ज्यांची विक्री सामान्यतः सणासुदीच्या काळात वाढते. पण या वेळी एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे लागू शकतात, कारण १ ऑक्टोबरपासून त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.    
ALSO READ: बँक कर्मचारी २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत संप का करत आहे? वाचा

१ ऑक्टोबरपासून टीव्ही आणि एसी महाग होणार!

प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांना धक्का देण्याची तयारी केली आहे.वाढत्या धातूंच्या किमती, चलन बाजारातील तीव्र चढउतार आणि पश्चिम आशियातील भू-राजकीय अस्थिरता यांमुळे सणासुदीच्या काळात भारतीय ग्राहकांवर महागाईचा हल्ला होत आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठे नुकसान होत असल्याचे दिसते. प्रमुख घरगुती उपकरणे आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांनी १ ऑक्टोबर २०२६ पासून   एअर कंडिशनर , एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीनच्या किमती वाढवण्याची तयारी केली आहे  .
 

या वर्षातील तिसरी दरवाढ

पीटीआयच्या वृत्तानुसार, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून केलेली दरवाढ ही २०२६ मधील या उद्योगातील दरवाढीची तिसरी फेरी आहे. तांबे, स्टील, ॲल्युमिनियम आणि कच्चे तेल उत्पादने यांसारख्या प्रमुख कच्च्या मालाच्या किमतीत झालेली मोठी वाढ, तसेच मालवाहतुकीच्या खर्चात झालेली वाढ, हे यामागील थेट कारण आहे.  
ALSO READ: १ ऑक्टोबरपासून हे नवीन नियम लागू होणार
अहवालानुसार, पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून सणासुदीच्या विक्रीदरम्यान एसी, टीव्ही आणि इतर घरगुती उपकरणांच्या किमतीत ८ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. एअर कंडिशनरच्या (एसी) किमतीत तात्काळ ५-८ टक्क्यांची वाढ होणार असली तरी,अनेक उत्पादक वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि एलईडी टीव्हीच्या किमतीतही ३-४ टक्क्यांनी वाढ करणार आहेत 
पीटीआयच्या वृत्तानुसार, ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्स यांसारख्या प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी ४-१०% दरवाढीची पुष्टी केली आहे किंवा ती लागू केली आहे.  
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये सुरू आताच आपले हॉटेल बुक करा

महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट, अपडेट जाणून घ्या

टीव्हीएसची इलेक्ट्रिक स्कूटरबाबत मोठी घोषणा, ग्राहकांना काय फायदा होणार?

गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातील नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव

LIVE: महापौरांनी छत्रपती संभाजीनगरमधील गुंठेवारीला पूर्णविराम दिला

पुढील लेख
Show comments