Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डिझेल भडका सुरूच ; दोन दिवसानंतर पुन्हा डिझेल महागले

Updated: सोमवार, 20 जुलै 2020 (11:04 IST)
 
इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार सोमवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये कायम असून डिझेलचा भाव ७९.८३ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ऐतिहासिक स्तरावर आहे. डिझेलचा भाव ८१.६४ रुपये असून पेट्रोल ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये असून डिझेल ७६.७७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ८३.६३ रुपये असून डिझेल दर ७८.६० रुपयांवर कायम आहे.
 
पेट्रोल आणि डिझेल Petrol and diesel दरवाढीवर गेल्या महिन्याच्या अखेरीस देशभरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कंपन्यांनी आठवडाभर इंधन दर स्थिर ठेवले होते. दरम्यान, जागतिक बाजारात देखील क्रूड ऑइलचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये यापूर्वी केलेल्या दरवाढीने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. माल वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर करते. डिझेल दरवाढीने यापूर्वीच माल वाहतूकदारांचे कंबरडे मोडले असून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दरवाढीचे संकेत दिले आहेत. मच्छिमार बोटींसाठी डिझेलचा वापर केला जातो. त्याशिवाय शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर डिझेलवरच चालतात. डिझेलमध्ये होत असलेली दरवाढ या घटकांचा खर्च वाढवणारी आहे. इंधन दरवाढीने येत्या काही आठवड्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
 
देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात 'अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्ती योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला

Asian Games 2026 साठी 20 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा

जस्मिन लँबोरियाने भारताचे १० वे बॉक्सिंग पदक जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला

एक-दोन झुरळे आढळल्यावरून परवाना रद्द करणे योग्य नाही; मुंबई उच्च न्यायालयान एफडीएला कडक शब्दात फटकारले

जंगलात वाघ कुठे आहे हे एआय मॉडेल सांगेल; महाराष्ट्रातील मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी एक नवीन उपक्रम

पुढील लेख
Show comments