बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By
Last Updated : सोमवार, 25 डिसेंबर 2023 (08:27 IST)

Christmas 2023 सांताक्लॉज कोण आहे? ख्रिसमस ट्री चा इतिहास काय? जाणून घ्या या उत्सवाची सुरुवात कशी झाली

येशू ख्रिस्ता यांच्या जन्मानिमित्त ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणारे लोक आपली घरे सजवण्यात आणि आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसाठी भेटवस्तू खरेदी करतात. या दिवशी लोक चर्चमध्ये जातात, कॅरोल गातात, एकमेकांना भेटवस्तू देतात आणि ख्रिसमस ट्री सुंदर पद्धतीने सजवतात.
 
आपण ख्रिसमसबद्दल बोलतो आणि सांताक्लॉजचा उल्लेख नाही हे कसे होऊ शकते? हे नाव ऐकताच आपल्या मनात लाल रंगाचा सूट घातलेला, पांढरी दाढी-मिशी असलेला, पाठीवर भेटवस्तूंनी भरलेला बंडल घेतलेल्या व्यक्तीची प्रतिमा उभी राहते. आज आम्ही तुम्हाला ख्रिसमस सणाचा इतिहास काय आहे, ख्रिसमस ट्री कधीपासून अस्तित्वात आला आणि सांताक्लॉजमागील रहस्य काय आहे हे सांगणार आहोत.
 
ख्रिसमसची सुरुवात कशी झाली?
ख्रिश्चन धर्म अस्तित्वात येण्यापूर्वी लोक हिवाळ्यातील सर्वात गडद दिवस प्राण्यांचे बळी देऊन साजरे करायचे. आधुनिक ख्रिसमस चौथ्या शतकात सुरू झाला असे मानले जाते परंतु त्याची तारीख 25 डिसेंबर, येशू ख्रिस्तांची जन्मतारीख या आधारावर निवडली गेली नाही.
 
असे म्हटले जाते की पोप ज्युलियस प्रथम यांनी सध्याच्या हिवाळ्याच्या हंगामात साजरे होणारे सण लक्षात घेऊन ही तारीख धोरणात्मकपणे दिली होती जेणेकरून अधिकाधिक लोक हा सण साजरा करू लागतील. याचा उगम रोमन आणि इतर युरोपीय सणांतून झाल्याचेही सांगितले जाते.
 
ख्रिसमस ट्री चा इतिहास काय आहे?
घरामध्ये ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा जर्मनीमध्ये उद्भवली. 1700 मध्ये ते इतरत्रही स्वीकारले जाऊ लागले. प्रोटेस्टेंट रिफॉर्मेशनचे नेते मार्टिन ल्यूथर यांनी घराच्या आत तारेमय आकाश असे वातावरण निर्माण करण्यासाठी झाडावर जळत्या मेणबत्त्या ठेवल्या.
 
इंग्लंडमध्ये ख्रिसमस ट्री परंपरा 1840 मध्ये सुरू झाली. याचे श्रेय राणी व्हिक्टोरियाचे पती प्रिन्स अल्बर्ट यांना जाते. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत, मेणबत्त्या, घरगुती सजावट, टॉफी-चॉकलेट आणि भेटवस्तूंनी भरलेली ख्रिसमस ट्री मध्यमवर्गीय घरांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती.
 
सांताक्लॉज कुठून आला?
सांताक्लॉजचे मूळ बहुतेक वेळा प्रसिद्ध सॉफ्टड्रिंक ब्रँड कोका-कोलाशी जोडलेले जाते. याच कंपनीने हे काम 1931 मध्ये इलस्ट्रेटर हॅडन संडब्लॉम यांना दिले, त्यानंतर फुगलेले गाल, पांढरी दाढी आणि लाल सूट घातलेल्या माणसाचे प्रतिकात्मक चित्र अस्तित्वात आले.
 
परंतु सांताक्लॉजची प्रेरणा कोठून आली याचा इतिहास शतकानुशतके (280 एडी) दयाळू संत निकोलसपर्यंत जातो. डच लोक अजूनही 6 डिसेंबरला सेंट निकोलसला 'सिंटरक्लास' म्हणून स्मरणात ठेवतात आणि 5 डिसेंबरला मिठाई आणि भेटवस्तू मिळतील या आशेने बूट घालतात.
 
कँडल जाळण्याची परंपरा कधीपासून सुरु झाली?
ख्रिसमसच्या निमित्ताने फुलांमध्ये मेणबत्त्या पेटवण्याची सुरुवात जर्मनीमध्ये 1833 मध्ये झाली. जेव्हा ख्रिसमसची कथा सांगताना एका लुथरन धर्मगुरूने मेणबत्त्या पेटवल्या. यानंतर धार्मिक परंपरेनुसार कुटुंबांनी लहान मेणबत्त्या बनवण्यास सुरुवात केली.
 
हे 'लाइट ऑफ द वर्ल्ड' म्हणजेच लख्ख जगाचे प्रतीक मानले जाते. 19व्या शतकाच्या अखेरीस ते अधिक सुशोभित झाले. मेणबत्त्यांची जागा दागिने, बेरी, पाइनकोन इत्यादींनी घेतली. लोकांनीही आपापल्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वागताच्या कड्या लावायला सुरुवात केली.
 
कार्ड पाठवण्याची सुरुवात कधीपासून झाली?
पहिले ख्रिसमस कार्ड 1611 मध्ये मायकेल मेयर या जर्मन चिकित्सकाने राजा जेम्स I आणि प्रिन्स ऑफ वेल्स यांना पाठवले होते. यामध्ये त्यांनी या सणासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तथापि 1843 नंतर ख्रिसमस कार्ड मोठ्या प्रमाणात पाठवणे सुरू झाले.
 
1843 मध्ये सिव्हिल सव्हेंट सर हेन्री कोल यांनी जॉन कॅलकट हॉर्सलीला ख्रिसमस कार्ड डिझाइन करण्यासाठी नियुक्त केले. त्याच वेळी 1870 च्या दशकात स्वस्त कार्डे दिसू लागली जी खूप लोकप्रिय होऊ लागली. यानंतर ख्रिसमसच्या निमित्ताने अभिनंदन संदेश पाठविण्यासाठी कार्ड वापरणे ही एक परंपरा बनली जी आजही सुरू आहे.