शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By

Christmas Tree Vastu Tips : ख्रिसमस ट्री वास्तू दोष दूर करतं, जाणून घ्या वास्तूनुसार सजावट कशी करावी आणि ठेवण्याची योग्य दिशा कोणती

Christmas 2022: लोक ख्रिसमस दरम्यान आपल्या घरात Christmas Tree सजवतात. पण वास्तूनुसार ख्रिसमस ट्री कशी सजवायची आणि कोणत्या दिशेला लावायची हे अनेक लोकांना माहित नसतं.
 
वास्तु शास्त्रात ख्रिसमस ट्री निगडित काही मान्यता आहेत. वास्तूनुसार योग्य दिशेने लावलेले ख्रिसमस ट्री घरातील वास्तू दोष दूर करते. वास्तुनुसार ख्रिसमस ट्री कशी सजवावी आणि ते लावण्याची योग्य दिशा कोणती आहे ते जाणून घेऊया.
 
जर तुम्ही घरी ख्रिसमस ट्री लावत असाल तर ते मेणबत्त्यांनी सजवा. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये आनंद आणि आशीर्वाद राहतो. लक्षात ठेवा की ते फक्त त्रिकोणी आकारात असावे.
 
वास्तुप्रमाणे ट्री चा वरील भाग त्रिकोणी आणि वरील बाजूस वाढत असलेला असावा तर हे खूप शुभ मानले जाते. असा ख्रिसमस ट्री जीवनात प्रगतीचा मार्ग खुला करतो.
 
ख्रिसमस ट्री नेहमी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. वास्तुमध्ये या दिशांना सकारात्मक मानले जाते. वास्तूनुसार घराच्या अंगणात ख्रिसमस ट्री लावणे शुभ मानले जाते.
 
घराच्या दक्षिण दिशेला ख्रिसमस ट्री कधीही लावू नये. यामुळे प्रगतीला बाधा येते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात. तसेच वास्तूनुसार ख्रिसमस ट्री कधीही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावू नये.
 
वास्तूनुसार ख्रिसमस ट्री ला रंगीबेरंगी दिवे आणि स्टार्सने सजवणे शुभ मानले जाते.
 
ख्रिसमसच्या झाडावर स्टार्स लावल्याने जीवनात उत्साह आणि आनंद वाढतो.
 
ख्रिसमस ट्री सजवताना त्यात काही खेळणीही ठेवावीत. पुढे ही खेळणी मुलांमध्ये वाटून द्यावी याने घरात आनंद येतो.