बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. धर्म
  2. »
  3. ख्रिश्चन
  4. »
  5. ख्रिसमस
Written By वेबदुनिया|

कॉर्न पॅनकेक

- प्रीता गडकरी

कॉर्न पॅनकेक
WD
साहित्य : 2 कॉर्न, 2 कप तांदूळ, अर्धा नारळ, 1/2 मैदा, 4 ब्रेडचे स्लाइस, 1 1/2 कप गरम दूध, 2 चमचे मीठ, 1 चमचा साखर, 50 ग्रॅम चीज व तूप.

कृती : कॉर्न किसून त्याला शिजवून घ्यावा. तांदूळ 2 तास भिजत घालावे, नंतर वाटून घ्यावे, नारळाचा कीस पाणी घालून वाटून घ्यावा. नंतर वाटलेले तांदूळ, मैदा, ब्रेडचा चुरा, मीठ, साखर एकत्र करून दुधाने पीठ भिजवावे, त्यात वाटलेले खोबरे घालून, मिश्रण 3 ता मुरू द्यावे, नंतर त्यात कॉर्नचा कीस घालावा, आवश्यकतानुसार त्यात थोडे पाणी घालून धिरड्या प्रमाणे पीठ तयार करावे. तव्यावर तूप लावून छान छोटी छोटी धिरडी करावी, झाकणे ठेवून वाफ येऊ द्यावी. धिरडे उलटू नये. धिरड्या वर किसलेले चीज घालून गरम गरम सर्व्ह करावे.