मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. धर्म
  2. »
  3. ख्रिश्चन
  4. »
  5. ख्रिसमस
Written By वेबदुनिया|

मलई बिस्किटे

मलई बिस्किटे
ND
साहित्य : 1/2 किलो मैदा, पाव किलो साखर, दोन वाट्या सायीचे दही, 5 ग्रॅम अमोनिया, 2 चमचे बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, एक वाटी तूप, व्हॅनिला किंवा जो आवडत असेल तो इसेन्स.

कृती : मैद्यात बेकिंग पावडर व सोडा घालून चांगले मिसळावे. दही, साखर, तूप व अमोनिया हे सर्व एकत्र करून हाताने फेसून घ्यावे. नंतर त्यात वरील मिसळलेल्या मैदा घालनू पीठ मऊसर भिजवावे. फार घट्ट वाटल्यास थोडे दूध घालावे. आदल्या दिवशी पीठ तयार करून ठेवून दुसऱ्या दिवशी त्याची जाड पोळी लाटावी व बिस्किटे कापून ओव्हनमध्ये भाजावीत.