बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (14:56 IST)

आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या लग्नात मोठं विघ्न

सध्या स्टार प्रवाहची मालिका आई कुठे काय करते हे नव्या वळणावर आली आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार स्टार प्रवाह वर येत असून सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची जय्य्त तयारी घरात सुरु आहे. अरुंधतीच लग्न होण्यापूर्वी अनिरुद्ध त्यात विघ्न आणणार असून त्याने अरुंधतीच्या लग्नाचे मंगळसूत्र तोडले आहे. अनिरुद्धच्या अशा वागण्याचा अरुंधतीला संताप येतो आणि ती अनिरुद्धाला चांगलंच सुनावते.

अनिरुद्धच्या अशा वागण्याचा घरातील सर्वानाच राग येतो. आणि ते अनिरुद्धाला सुनावतात.एवढेच नाही तर नेहमी अनिरुद्धाची बाजू घेणारी त्याची आई कांचन आणि अभिषेकला देखील अनिरुद्धाचे असे वागणे आवडत नाही. ते देखील त्याच्यावर राग करतात. आता पुढे काय ट्विस्ट येणार हे येत्या भागातच समजेल. 
 
Edited By- Priya Dixit