शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (14:40 IST)

'लक्ष्य' फेम अभिजीत अडकला विवाहबंधनात

सध्या कलाविश्वात लग्नाची शहनाई वाजत आहे. अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहे. आता अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा लग्नाच्या बेडीत अडकला असून त्याने सेजल वर्देसह नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. 
 
24 फेब्रुवारीला अभिजीत व सेजल यांचा विवाहसोहळा पार पडला. या दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘सेलिब्रिटी प्रमोटर्स’ या इन्स्टाग्राम पेजवरुन लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले आहे.
 
सोशल मीडियावर त्याच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी अभिजीत- सेजलला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. अभिजीतने जून महिन्यात सेजलसह गुपचूप साखरपुडा केला होता.
 
अभिजीत श्वेतचंद्र स्टार प्रवाहवरील लक्ष्य मालिकेतून घराघरात पोहोचला आहे तर सेजलही एक अभिनेत्री आहे.