बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (14:30 IST)

'तुझ्या माझ्या संसाराला' फेम अमृता पवारचं लग्न... हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ

amruta pawar
मराठी अभिनेत्री अमृता पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. नील पाटील असं अमृताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. अमृता-नीलचा साखरपुडा एप्रिल महिन्यात पार पडला होता. आता दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू असून नुकताच अमृता-नीलचा हळदी समारंभ पार पडला. पिवळ्या रंगाच्या साडीत आणि फुलांच्या दागिन्यात नटलेल्या अमृताचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं.
 
 
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अमृता पवार ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत अदितीची भूमिका साकारून घराघरात पोहोचली. मालिकेतील अदिती-सिड ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘जिगरबाज’ या मालिकांमध्येही अमृताने काम केलं आहे.