मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 12 मे 2022 (07:57 IST)

मोहिनी एकादशी कथा Mohini Ekadashi Katha

mohini ekadashi katha
ही कथा महर्षी वशिष्ठांनी श्री रामचंद्र यांना सांगितली होती. एकदा श्रीराम म्हणाले की हे गुरुदेव! सर्व पापांचे व दु:खाचा नाश करणारे व्रताचे वर्णन करा. सीतेच्या वियोगामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला आहे.
 
महर्षि वशिष्ठ म्हणाले- हे राम! आपण खूपच सुंदर प्रश्न मांडला आहे. आपली बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. एखादी व्यक्ती आपले नाव घेऊन शुद्ध आणि पवित्र होते तरीही लोकांच्या हितासाठी हा प्रश्न चांगला आहे.
 
वैशाख महिन्यात येणार्‍या एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे. हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पाप आणि दु:खापासून मुक्त होतो. याने सर्व मोह-मायेपासून मुक्ती मिळते. मी याची कथा सांगत आहोत, ध्यानपूर्वक ऐकावी.
 
सरस्वती नदी काठावर भद्रावती नावाच्या नगरीत द्युतिमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता. तेथे धन-धान्याने संपन्न आणि पुण्यवान धनपाल नावाचा वैश्य देखील राहत होतो. तो अत्यंत धर्माळु आणि विष्णू भक्त होता. त्यांच्या नगरात अनेक भोजनालय, प्याऊ, विहीरी, तळाव, धर्मशाला निर्मित केल्या गेल्या होत्या. रस्त्यांवर आंबे, जांभूळ, कडुलिंबाचे अनेक वृक्ष लावले गेले होते. त्यांचे 5 पुत्र होते- सुमना, सद्‍बुद्धि, मेधावी, सुकृति आणि धृष्टबुद्धि.
 
यापैकी पाचवा पुत्र धृष्टबुद्धि महापापी होतो. तो पिताची आज्ञा मानत नसे. तो वेश्या, दुराचारी मनुष्यांच्या संगतीत जुगार खेळत असे, पर-स्त्रीसह भोग-विलास करत असे आणि मद्य-मांसाचे सेवन करत असे. या प्रकारे तो चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करीत असे. या कारणांमुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते. घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने व कपडे विकायला सुरुवात केली. जेव्हा सर्व काही नष्ट झालं तेव्हा वेश्या आणि दुराचारी लोकांनी त्यांचा साथ सोडून दिला. आता तो भूक-तहानमुळे अती दु:खी राहू लागला. कोणाचीही साथ नसल्यामुळे चोरी करु लागला. 
 
एकदा त्याला पकडल्यानंतर वैश्यच्या मुलाला असल्याचे कळल्यावर त्याला ताकीद देऊन सोडण्यात आलं. परंतु दुसर्‍यांदा पकडण्यात आल्यावर त्याला कारागृहात टाकण्यात आलं. तुरुंगात त्याला खूप दुःख देण्यात आले. नंतर राजाने त्याला शहर सोडण्यास सांगितले. तो शहराबाहेर जंगलात गेला. तेथे वन्य प्राणी आणि पक्षी यांचे शिकार करुन खाऊ लागला. काही काळानंतर तो बहेलिया बनून गेला आणि धनुष्यबाण घेऊन त्यांनी प्राणी व पक्षी मारुन खाण्यास सुरवात केली. एकदा भूक-तहानमुळे व्यथित होऊन तो भटकत-भटकत कौडिन्य ऋषींच्या आश्रमात पोहचला. तेव्हा वैशाख महिना होता आणि ऋषी गंगा स्नान करत होते. त्यांच्या भिजलेल्या कपड्यांचे काही शिंतोडे त्यावर पडल्यामुळे त्याला काही सद्‍बुद्धी प्राप्त झाली.
 
त्याने कौडिन्य मुनींसमोर हात जोडून म्हटले की हे मुने! मी जीवनात खूप पाप केले आहे. या पापांपासून मुक्तीसाठी सोपा व धन खर्च न करावा लागणारा उपाय सांगा. त्याचे वचन ऐकून मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले की तू वैशाख शुक्लच्या मोहिनी एकादशीचे व्रत करं. याने तुझे सर्व पाप नष्ट होतील. मुनींचे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगिल्याप्रमाणे विधीपूर्वक व्रत केलं. या व्रताच्या प्रभावामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि शेवटी तो गरुडावर बसून विष्णुलोकात गेला.