गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (09:32 IST)

'हरिओम' मधील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

hariom marathi movie
मराठी चित्रपटसृष्टीत दिमाखात एन्ट्री करत 'हरिओम' चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडत आहे. पहिलाच चित्रपट तोही एक असा ऐतिहासिक विषय जो सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे, तो आधुनिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडणे, हे आव्हानात्मकच आहे. 'हरिओम' चित्रपटाचा ट्रेलर, टिझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटासाठीची प्रेक्षकांची उत्सुकता वाढताना दिसत आहे. अशातच चित्रपटातील 'डीजे वाल्या' हे धमाल गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्याच्या शीर्षकावरूनच आपल्याला एकंदर गाण्याचा बाज कळत आहे. तरुणांपासून ते प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने ठेका नाही धरला, तर नवल असेल. येत्या प्रत्येक सणात, उत्सवात, लग्न समारंभात या गाण्याची चलती असणार हे नक्की. पहाडी, रांगड्या आवाजाचे बादशाह आदर्श शिंदे यांचा या गाण्याला आवाज लाभला असून निरंजन पेडगावकरांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तसेच या गाण्याचे बोल राहुल काळे यांचे आहेत.
 
विशेष म्हणजे शिवरायांची मूल्ये जपण्यास शिकवणारा 'हरिओम' हा एक कौटुंबिक चित्रपट असला तरी यात नव्या पिढीला मोलाची शिकवण देऊन जाणार, असे एकंदर चित्र दिसत आहे. श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत हरिओम घाडगे निर्मित, आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित हरिओम या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे हे प्रमुख भूमिकेत असून  ‘हरिओम’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर राज सुरवडे आहेत. येत्या १४ ऑक्टोबरला 'हरिओम' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे."
Yogita Raut 
 
Published By -Smita Joshi