शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:18 IST)

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा 'या' सिरियल यामधून करणार एंट्री

लाडके भाऊजी आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर पूर्ण राज्याला माहीत आहेत, आता महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. या पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका असणार आहे. यात स्टार प्रवाह वाहिनीवर काही वर्षांपूर्वी लक्ष्य या मालिकेतून युनिट ८ टीमची शौर्यगाथा प्रेक्षकांनी अनुभवली. आता ‘नवे लक्ष्य’ हा मनोरंजनाच्या ठेव्यातील नवाकोरा अध्याय असेल.

पाच जिगरबाज पोलिसांनी उकल केलेल्या गुन्ह्यांची गोष्ट ‘नवे लक्ष्य’मधून टीव्ही वर भेटीला येईल. नवं कथानक आणि नव्या टीमसह युनिट ९ ची टीम सज्ज झाली आहे. या मालिकेत एका पोलिसाच्या भूमिकेत आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर दिसणार आहे. सोहमची ही पहिलीच मालिका आहे.