रविवार, 25 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (20:49 IST)

त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही : नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. माझे मित्र फडणवीसांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा पटोले यांनी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. 
 
''सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलीकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे'', असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.