1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जानेवारी 2024 (17:40 IST)

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

photo viral
‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. काही महिन्यांपूर्वी मालिकेत आरोही म्हणजे अभिनेत्री कौमुदी वलोकरने चाहत्यांना वर्षा अखेरीस सुखद धक्का दिला आहे. कौमुदीने गुपचूप साखरपुडा उरकला आणि मग याचे फोटो अपलोड करून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
 
अभिनेत्री कौमुदी वलोकरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यामध्ये ती होणाऱ्या नवऱ्याबरोबर दिसत असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की “उद्या आपल्या आयुष्याचे पोस्टर उघड होत आहे.” “या वर्षाच्या शेवटी आम्ही आमचा नवा अध्याय सुरू करत आहोत,” असं लिहित अभिनेत्रीने साखरपुड्याचा फोटो शेअर केला. कौमुदीचा आकाश चौकसेबरोबर थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
कौमुदीच्या साखरपुड्याच्या पोस्टवर चाहत्यांनी आणि इतर कलाकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कौमुदी ‘शाळा’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर कौमुदी ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटात पाहायला मिळाली. तसेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत झळकली होती.