शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2023 (10:57 IST)

अर्जुन कपूरचा सेमी न्यूड फोटो मलायका अरोराने शेअर केला, लिहिले- माय लेझी बॉय

Malaika share Arjun Kapoor Photo Viral
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. अनेकदा दोघंही एकत्र दिसतात. हे कपल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतं आणि त्यांचे फोटो शेअर करत असतात. नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
 
मलायकाने एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. मलायकाने रविवारी (28 मे) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून अर्जुनची मोनोक्रोमॅटिक इमेज शेअर केली. या फोटोत अर्जुन सेमी न्यूड दिसत आहे. अभिनेत्रीने चित्रासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, "माय लेझी बॉय
." अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर या पोस्टचा स्क्रीनशॉट देखील टाकला आहे.
अर्जुन आणि मलायका बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लोकांच्या नजरा टाळून अनेक वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये राहिले, पण नंतर त्यांनी ते सार्वजनिक केले. तेव्हापासून दोघे अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
 
वर्क फ्रंटवर अर्जुन शेवटचा कुत्ते या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. त्याच्याशिवाय नसीरुद्दीन शाह, राधिका मदन आणि कोंकणा सेन शर्मा, तब्बू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'द लेडी किलर' या चित्रपटात दिसणार आहे.