गुरूवार, 16 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2022 (18:45 IST)

बाळूमामा फेम अभिनेता सुमित पुसावळे विवाह बंधनात अडकला

Actor Sumit Pusavale of Balumama fame got married
सध्या लग्नसराई सुरु आहे. मराठी सिनेजगत देखील या मध्ये मागे नाही. अलीकडेच तुझ्यात जीव रंगला फेम राणा दा हार्दिक जोशी आणि अंजली बाई म्हणजे अक्षया देवधर हे वैवाहिक बंधनात अडकले आहे. आता बाळुमामाच्या नावं चांगभलं फेम अभिनेता सुमित पुसावळे हा देखील आज वैवाहिक बंधनात अडकला आहे. सुमित आणि मोनिकाने आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा वचनांसह विवाह गाठ बांधली. सांगोला येथे सहकलाकार, मित्र, आप्तेष्ट नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.  सुमित मोनिकाच्या विवाहापूर्वी काल साखरपुडा आणि हळदीचा समारंभाचा कार्यक्रम पार पडला. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आले आहे.