गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (21:11 IST)

या मराठमोळ्या अभिनेत्याची गंभीर आजाराशी झुंज, आर्थिक मदतीसाठी आवाहन

Famous actor in Marathi cinema Dr. Luxury rights
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे.त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अभिनय केले आहे. चार दिवस सासूचे, वादळवाट, अशा मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या घरात आणि मनात जागा निर्माण केली. आता हे हुरहुन्नरी कलाकार एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे.  त्यांना सुमारे सहा वर्षांपासून ब्रेन स्ट्रोकच्या आजाराशी झुंज देत आहे . या दरम्यान त्यांना आर्थिक भार वहन करावे लागले. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरी जावे लागत आहे. विलासच्या एका मित्राने त्यांना मदत करण्यासाठी आर्थिक आवाहन केले आहे. या दरम्यान त्यांना हृदयविकाराच्या त्रासातून जावे लागत आहे. या साठी शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच त्यांना सध्या कावीळची लागण देखील लागली आहे. उपचारावर लागणारा खर्च उचलण्यासाठी त्यांच्या एका मित्राने राजू कुलकर्णीने चाहत्यांकडे मदतीचे आवाहन करून एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. 
 
या पोस्ट मध्ये त्यांनी चाहत्यांना त्यांची आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

Edited By- Priya Dixit