रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (21:13 IST)

प्रशासकीय कामाचा तडाका असल्याने अजित मार्गावर यावेच लागते भावा, रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट

rupali patil
पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. अजित पवारांच्या या ऑफरनंतर वसंत मोरे लवकरच मनसे पक्ष सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
वसंत मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुखराज ठाकरे यांना सांगितल्या आहेत. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, पुण्यात आल्यानंतर एक बैठक घेऊ आणि काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.
 
वसंत मोरेंच्या या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे रुपाली पाटील यांनी अजित पवार आणि वसंत मोरे यांच्या लग्नातील भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच १६ वर्षें राजकारणात काम करून, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उगीच प्रवेश केला नाही. अजितदादा यांचे दमदार नेतृत्व, वडीलधारी बंधू म्हणून असलेला आधार, प्रशासकीय कामाचा तडाका असल्याने अजित मार्गावर यावेच लागते भावा, असं रुपाली पाटील यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor