Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ALE RE POSTER BOYZ 2 - 'आले रे पोस्टर बॉईज २', ढोल ताशाच्या गजरात पोस्टरचे अनावरण

Updated: शनिवार, 22 एप्रिल 2023 (15:14 IST)
 
'आले रे पोश्टर बॉईज २'चे पोस्टर पाहता यात तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकुळ घालणार आहेत, हे नक्की ! त्यांच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये 'फुल्ल बॉडी मसाज, कॉल डॉली' असे लिहिलेले दिसत आहे, म्हणजे हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं', या उक्तीनुसार कोणाची फसवणूक होणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तळपदे, एएनडब्लू स्टुडिओज आणि विरांगना फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दिप्ती तळपदे निर्माते असून अमित भानुशाली सहनिर्माते आहेत. हितेश मोडक यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाला डॉ. सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद लाभले आहेत.  
 
निर्माते श्रेयस तळपदे म्हणतात, " पोस्टर बॉईजच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी मला विचारणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा या पोश्टर बॉईजना घेऊन त्यात कॉमेडीचा तडका मारण्यास आम्ही सज्ज झालो आहोत. आता या पोश्टर बॉईजनी परदेशात भरारी घेतली आहे त्यामुळे याची धमालही दुप्पट झाली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहेत.''
 
निर्मात्या सेजल शिंदे म्हणतात, ‘हल्ली मराठीमध्ये खूप नवनवीन विषय हाताळले जात आहेत. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणेही गरजेचे असते. आले रे पोश्टर बॅाईज २’ सारख्या चित्रपटांमधून दोन्ही गोष्टी साध्य होतात.’’ तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, ‘’पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झाली आहे. कलाकारही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे. असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे, ‘पोश्टर बॅाईज २’ ही सिनेप्रेमींना आवडेल.’’
 

सर्व पहा

करण जोहर 'ट्रेटर्स २' शोच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार

कियारा अडवाणीचे खरे नाव माहित आहे का? सलमान खानच्या या सल्ल्याने तिची ओळख बदलली

मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात रेखा यांना विशेष सन्मान मिळणार; 'उमराव जान' प्रदर्शित होणार

करिश्मा तन्ना आणि पती वरुण बंगेरा आई-बाबा झाले, गुरुपौर्णिमेला छोटा राजकुमार घरी आला

'रामायणम'मधील रकुल प्रीत सिंगचा 'शूर्पणखा' लूक चर्चेत; चाहत्यांनी 'परफेक्ट कास्टिंग' म्हटले

सर्व पहा

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

कियारा अडवाणीचे खरे नाव माहित आहे का? सलमान खानच्या या सल्ल्याने तिची ओळख बदलली

भूमी पेडणेकरच्या सावन पोस्टने खळबळ उडवून दिली: नेटिझन्सने ट्रोल केले

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक; जिथे पावसाळ्यात जमीन आणि आकाश फुलांनी बहरते

पुढील लेख
Show comments