1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (11:45 IST)

अमेय वाघ होम क्वारंटाईन, फेसबुकवर विडीओ केला शेअर

amey wagh
अभिनेता अमेय वाघ एका नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेला होता. मात्र, कोरोनामुळे त्याच्या नाटकाचे 14 पैकी 11 प्रयोग रद्द झाले आणि तो भारतात परतला. कोरोना अमेरिकेतही वाढल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टींना सोमोरे जावे लागले, याबाबत अमेयने स्वत: आपल्या फेसबुक अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत अनुभव सांगितला आहे. या व्हिडीओत अमेयने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ प्रशासनाचं, विमानतळावर कोरोना टेस्ट घेणारे डॉक्टर, पोलीस आणि सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत धन्यवाद मानले.
 
मुंबईत आमचं विमान लँड झालं. विमानतळावर अत्यंत जलद गतीने सर्वांची कोरोनाची टेस्ट घेतली गेली. विशेष म्हणजे मला याचं कौतुक वाटलं की, टेस्ट घेणारे वैद्यकीय विद्यार्थी किंवा तरुण डॉक्टर होते. ते स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करत होते. त्यांना सगळ्यात आधी धन्यवाद म्हणायचं आहे.
 
विमानतळाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मला मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे. कारण अप्रतिम पद्धतीने काम सुरु होतं. पोलीस खाते, आर्मीतील जवान यांच्या मदतीने सर्व काम सुरळीत चालू होतं. त्यांना मला धन्यवाद म्हणायचं आहे.आम्ही अमेरिकेत आल्यामुळे हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का बसलेला आहे”, असं अमेय वाघ म्हणाला.