1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2019 (12:24 IST)

'प्रमोशन'साठी अमेयची हटके स्टाइल

'Ameya's style for promotion
अमेय वाघ म्हंटला की त्याचा स्वॅग हा येतोच! त्यात जर गोष्ट त्याच्या आगामी सिनेमाची असेल, तर मोठी हवा व्हायलाच हवी, त्यासाठी तो आपल्या स्टाइलमध्ये विविध प्रयोग करतानाही दिसून येणार आहे. आपल्या टीमशी संवाद साधत, विविध प्रकारचे फॅशनेबल कपडे तो परिधान करणार आहे. याआधी 'फास्टर फेणे', 'मुरांबा' या चित्रपटांच्या प्रमोशन वेळी देखील अमेयने आपल्या हटके स्टाइल वर भर दिला होता. अगदी तसेच, आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने आपली फॅशन लाॅक केली आहे.
 
सिनेमा असो व नाटक असो अमेय नेहमी सरसच राहिला आहे. त्यामुळे गर्लफ्रेंड सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानही तो त्याच्या हटके लुक्सने प्रेक्षकांची मने जिंकेल, यात शंका नाही.