मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (15:22 IST)

महर्षी चित्रपट संस्था आयोजित लघुपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

नाशिक मधील स्थानिक कलावतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे त्यांना मुंबई पुण्याला जावे लागू नये. कुठल्याही निर्मात्याला प्रत्येक वेळेस बाहेरुन कलाकार मागवाने परडत नाही त्यांना स्थानिक कलाकार मिळतील या हेतुने व स्थानिक कलाकारांचा उत्साह वाढवन्या बरोबर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लघूपट महोत्सवाचे मागील पाच वर्षा पासून आयोजन करण्यात येते.
 
याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून पुरस्कार वितरण कार्यक्रमास मा महसूल उपायुक्त गोरक्ष गाडिलकर साहेब, सिने अभिनेते मा कांचन पगारे, शिल्पी अवस्थी, सामाजिक कार्यकर्ते मोहनभाऊ अढागळे, पी कुमार, संजय करंजकर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवर, दिपालीताई गीते आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
यावेळी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत आशा व गट प्रवर्तक संस्था, महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटना, मा डॉ अतुल वडगावकर व दवाखाना, छात्रभारती विद्यार्थी संघटना व मानव उत्थान मंच नाशिक या संस्थांचा “कोरोना सन्मान पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. समाजात खरोखर ज्यांनी आपत्ति काळात कार्य केले त्यांच्या कार्याची दखल कलावंताच्या संस्थेने घ्यावी ही अभिमानाची व गोरवाची बाब आहे प्रशासनाला हव्या असलेल्या प्रबोधन व जनजागृती साठी युवकांनी लघूपट तयार करावे कोरोना आपत्ति अजुन गेली नाही आपण गाफिल राहून इतरांना ही असुरक्षित करु नये सर्वांनी काळजी घ्यावी विजेत्या लघुपटाचे कलाकार व निर्मात्यांचे त्यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस मा महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या तर भाषणाचा मोह न धरता कलाकार व निर्मात्याच्या अडचणी बाबत अभिनेते मा कांचन पगारे यानी थेट संवाद साधत कला जर अंगी असेल व अभिनय निपुण असाल तर त्याला वर्ण वय ऊंची अशी कुठलीही अड़चन येत नाही प्रत्येकाला अभिनय क्षेत्रात स्थिर होण्यास किंवा संधी मिळवण्यासाठी वयाची 40 शी तरी गाठावी लागते म्हणून संयम सोडून नका आलेल्या संधीचे सोने करा यश आपली वाट पहात आहे मी ही आपल्या सोबत आहे नाशिक मध्ये आता अनेक वेब सिरिज व फ़िल्म तैयार होत आहे यात नक्की महर्षी चित्रपट संस्थेचा सिंहाचा वाटा असल्याचे कांचन पगारे यांनी सांगितले.
 
संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, नव नवीन कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी कार्य शाळेचे आयोजन केले जाणार आहे, संस्थेच्या महर्षी लघुपट महोत्सवाचा सामाजिक विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या महोत्सवापैकी पहिल्या तीन क्रमांक मध्ये नंबर लागतो ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.
महर्षी लघुपट महोत्सवाचे निकाल
 
प्रथम क्रमांक : नाऱ्या या लघुपटास ..
द्वितीय क्रमांक : Our Environment या लघुपटास तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तितली तर उत्तेजनार्थ पारितोषिके वावरी, ग्लोबल मोबाईल व विधेय या लघुपटास देण्यात आले
सामाजिक संस्थांची माहिती राजु शिरसाठ यांनी दिली तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बर्वे व किरण काळे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव ऍड अमोल घुगे, दिनकर पांडे, प्रा सोमनाथ मुठाळ, कृष्णकुमार सोनवणे,डॉ अजय कापडणीस, सुनील परदेशी, करण माळवे, गौतम तेजाळे, पंकज वारुळे, विजया तांबट, विजया जाधव व आर्या पगारे आदींनी परिश्रम घेतले.