Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'बबन'ने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड'

Updated: गुरूवार, 1 मार्च 2018 (10:55 IST)
 
विशेष म्हणजे, आतापर्यंत साजरा करण्यात आलेल्या इको फ्रेंडली रंगपंचमीतल्या या अनोख्या धूळवडीचा स्थानिक नागरिकांनीदेखील मनसोक्त आनंद लुटला.  द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाचे राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त 'ख्वाडा'फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या मोशन आणि टीझर पोस्टरवर देखील दोन प्रेमीयुगुल चिखलाने माखले असल्याचे दिसून येते. याचाच संदर्भ घेत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील म्हसे गावात अनेक प्रेमी जोडप्यांना घेऊन चिखलातील अनोखी धुळवड साजरी करण्यात आली. याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे सांगतात की, 'महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य असून, शेतकऱ्याला येथे महत्वाचे स्थान आहे.शिवाय प्रत्येक शेतकऱ्याची नाळ आपल्या मातीशी जुळलेली असते. गावच्या मातीच्या रंगाची आणि सुगंधाची तोड इतर कोणत्याही रंगात नसल्यामुळे, आपल्या मातीशी एकरूप होण्यासाठी अशी इतरांहून वेगळी 'धुळवड' साजरी करण्याचे आम्ही ठरवले'. कुतूहलाची गोष्ट म्हणजे, चिखलात रंगपंचमी खेळण्याची म्हसे गावक-यांची ही प्रथा असून, आसपासचे गाव विविध रंगात न्हात असताना, इथे गावरान मातीच्या चिखलात ग्रामस्थ स्वतःला झोकून देतात, अशी माहिती समोर आली आहे.
धुळवडीच्या या अनोख्या पद्धतीबरोबरच पारंपारिक 'होळी' दहनाचा कार्यक्रमदेखील येथे पार पडला. म्हसे ग्रामस्थांचा सहभाग लाभलेल्या या 'होळी' उत्सवामध्ये लेझीमचा तालदेखील स्थानिकांनी धरला.  
 
'बबन' हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, भाऊरावांनी या सिनेमाचे लेखनदेखील केले आहे. 'ख्वाडा' अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका असून  गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री 'बबन' मध्ये झळकणार आहे. विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप  फंड आणि भाऊसाहेब शिंदे या चौकडीने सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरणार आहे.

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

शुगर डॅडी' वादाच्या पार्श्वभूमीवर, गोविंदा पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोमध्ये दिसणार!

डॉ. गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी यांचे 'आता थांबवायचं कसं?' नाटक सानंदच्या रंगमंचावर

Badshah Divorce लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच रॅपर बादशाहचा दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट

Aishwarya Rai Raksha Bandhan ऐश्वर्याने आणि आराध्याने आपल्या भावांना राखी बांधली

'दायरा'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटात करीना कपूरने डीसीपीची भूमिका साकारली

पुढील लेख
Show comments