1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (15:08 IST)

BACK TO SCHOOL - २२ जूनला 'बॅक टू स्कूल'

back to school marathi movie
शाळा... या वास्तुशी आपले सगळ्यांचेच एक भावनिक नाते जुळलेले असते. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या दिवसांपर्यंतच्या असंख्य आठवणी मनात कायमच कोरलेल्या असतात मग त्या चांगल्या असो वा कटू. प्रत्येकाची नाळ ही शाळेशी जोडलेली असतेच. शाळेच्या याच अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यासाठी सतिश महादु फुगे घेऊन आले आहेत ' बॅक टू स्कूल'. रंगसंस्कार प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २२ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ. परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी, ईशा अग्रवाल, प्रसाद कुलकर्णी, विराज जाधव,आयुष जगताप, तुषार गायकवाड, यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड, आर्या घारे, विशाखा अडसूळ, प्रगती पिंगळे, हिमांगी टपळे, शर्वरी साठे, तन्वी गायकवाड, नंदिनी पाटोळे, साक्षी शेळके, मौली बिसेन आणि आर्या कुटे यांच्या प्रमुख भूमिका असून सव्वाशे पेक्षा जास्त कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. शुभांगी सतिश फुगे, सतिश महादु फुगे या चित्रपटाचे निर्माते असून प्राची सतिश फुगे कार्यकारी निर्माती आहे तर छायाचित्रण दिग्दर्शक श्रीनिवास नामदेव गायकवाड आहेत.
 
  एका पाटीवर दोन खडू ठेवलेले असून त्यावर शाळेचे चित्र रेखाटण्यात आले आहे. शाळेची सफर घडवणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर अतिशय आकर्षक असून ते शाळेच्या भावविश्वात नेणारे आहे. सतिश महादु फुगे आणि अमित नंदकुमार बेंद्रे यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या 'बॅक टू स्कूल' च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.
 
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सतिश फुगे म्हणतात, '' शाळा म्हणजे आपले दुसरे घर. शाळेची गोष्टच निराळी आहे. आईनंतर तीच आपल्याला जगायला शिकवते. अनेक आठवणी शाळा जपते आणि त्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात. याच आठवणी नव्याने जागवण्यासाठी 'बॅक टू स्कूल' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा असा आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी जवळचा असणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याबरोबरच आम्ही आमच्या नवीन चित्रपटाचीही घोषणा करत आहोत. तोही चित्रपट लवकरच भेटीला येईल.