Festival Posters

ठाकरेचे प्रिमियर दिग्दर्शक पानसे आणि राऊत वाद, अर्ध्यातून पानसे निघून गेले

गुरूवार, 24 जानेवारी 2019 (11:04 IST)
सगळीकडे चर्चा आहे ती ‘ठाकरे’ या चित्रपटाची. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे आज स्क्रीनिंग होते. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे देखील आले होते. मात्र ते चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून तडकाफडकी निघाल्याची घटना घडली आहे. वडाळ्यातल्या कार्निव्हल आयमॅक्समध्ये सुरू असलेल्या या स्क्रीनिंगला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं सिनेमागृह फुल्ल झालं. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अभिजित पानसेंसह कुटुंबीयांना स्क्रीनिंगला बसण्यासाठी पुढच्या रांगेत जागा आरक्षित करण्यात आली होती. परंतु एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मागच्या बाजूला जागा आरक्षित ठेवण्यात येते.सिनेमागृहात बसण्यासाठी मागच्या बाजूला जागा न मिळाल्यानं अभिजित पानसे प्रचंड संतापले. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊतांचं ऐकून न घेता 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगमधून अभिजीत पानसे कुटुंबीयांसह तडकाफडकी निघाले. 

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

हृतिक रोशनला त्याच्या 'गुड बॉय' प्रतिमेतून बाहेर पडायचे आहे, सोशल मीडियावर 'ग्रे शेड्स' असलेल्या भूमिकेच्या शोधात

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नाशिक पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक

संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी जुळ्या मुलांचे पालक झाले

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिराला भेट दिली

अनवाणी प्रवास करत अभिनेत्रीने घेतले तिरुपतीचे दर्शन

पुढील लेख
Show comments