शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 9 जानेवारी 2019 (09:47 IST)

लिखाणातून अभिनयाकडे !

'बालक पालक', 'यल्लो', 'बाळकडू' अशा चित्रपटांना आपल्या खुमासदार लेखनशैलीनं लोकप्रिय करणारे गणेश पंडित यांचे अभिनय कौशल्यही लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित, शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' या १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
 
गणेश पंडित यांनी राणी मुखर्जीचा गाजलेला 'हिचकी' 'हॉर्न ओके प्लिज' अशा हिंदी चित्रपटांसाठी तर 'बंध नायलॉनचे', 'अंड्या चा फंडा' अशा मराठी चित्रपटांसाठी पटकथा, संवाद लेखकाची भूमिका बजावली असून महाविद्यालयांसाठी एकांकिका लेखन आणि दिगदर्शनही केले आहे. आजवर गणेश पंडित यांच्या लेखणीतून साकारलेल्या विषयांनी नेहमीच प्रेक्षकांना भरभरून हसवलं, मनोरंजन केलं प्रसंगी विचार करण्यासही प्रवृत्त केलं. या पूर्वी त्यांनी 'रोड टू संगम', शूद्र : दि रायजिंग' आणि 'बालक पालक' या चित्रपटांत छोटी भूमिका साकारली होती. आता 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' निर्मित 'डोक्याला शॉट' या चित्रपटातून ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओमकार गोवर्धन आणि प्राजक्ता माळी यांच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रेक्षकांवर आपल्या लिखाणाची जादू करणाऱ्या गणेश पंडित यांच्या अभिनयाचीही जादू प्रेक्षकांवर भुरळ पाडेल.