मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 जानेवारी 2019 (11:57 IST)

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं प्रदर्शित

"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना पाहिल्यावर जी गोड भावना जाणवते ती या गाण्यातून सांगितली गेली आहे. चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे हे या गाण्यात दिसत आहे. एक हलकं फुलकं पण तितकेच रोमँटिक असे हे गाणं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या मधुर आवाजात स्वरबद्ध केले असून मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. अतिशय सुंदर असे हे गाणे त्र्यंबकेश्वर जवळ चित्रित करण्यात आले आहे. गुरु ठाकूर आणि मंदार चोळकर यांनी अतिशय समर्पक शब्दात प्रेम हि भावना मांडली आहे. तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले.
प्रेमाला प्रत्येकजण आपल्या चौकटीत मांडत असतो. कोणासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे. कोणासाठी प्रेम म्हणजे समर्पण आहे. तर कोणासाठी प्रेम म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीची सोबत आहे. अशाच काहीशा संकल्पनेवर आधारित 'प्रेमवारी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'प्रेमवारी' हा सिनेमा व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे. या सिनेमाला. या सुंदर चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.