शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (17:44 IST)

अभिनेते भारत गणेशपुरे यांना मातृशोक

चला हवा येऊ द्या या हास्य मालिकेच्‍या माध्यमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या आई मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे गुरूवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. त्‍यांचे मरणोत्‍तर नेत्रदान करण्‍यात आले.
 
भारत गणेशपुरे यांचे बंधू मनीष यांच्‍या रहाटगाव येथील राहत्या घरी त्यांच्या आई मनोरमाबाई यांनी अखेरचा श्‍वास घेतला. अभिनेते भारत गणेशपुरे हे मूळचे अमरावती जिल्‍ह्याचे आहे. मनोरमाबाई यांची एकूण चार अपत्ये त्यांच्यापैकी एक मुलगा आणि मुलीचे निधन झाले. मनोरमबाई यांच्या पश्चात भारत आणि मनीष ही दोन मुलं, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.