1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (19:57 IST)

महेश मांजरेकर यांची कर्करोगावर मात

bigg boss
काही दिवसांपूर्वीच सुप्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाला होता. यानंतर मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. 
 
महेश मांजरेकर यांची प्रकृती पूर्णपणे ठीक असून, ते कर्करोग मुक्त झाले आहेत. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या लेकीने देखिल त्यांची हेल्थ अपडेट शेअर केली होती. दरम्यान याच काळात त्यांनी ‘बिग बॉस 3’चे शूटिंग सुरु केले होते. दरम्यान या काळात मांजरेकरांनी तब्बल 35 किलो वजन कमी केले. महेश मांजरेकरांनी अंतिम सिनेमाचे  चित्रीकरण पूर्ण  केले आणि त्यानंतर पुढील उपचार घेतले होते.