मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2017 (11:39 IST)

पत्नीच्या त्रासाला कंटाळून निर्माता अतुल तापकीर यांची आत्महत्या

dholtashe producer atul tapkir suicide
चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष पिऊन त्यांनी जीवन संपवलं. अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये पत्नीवर आरोप करण्यात आले आहेत. अतुल तापकीर हे ढोल ताशा चित्रपटाचे निर्माते आहेत. पुण्यातील डेक्कन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ढोल ताशा सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला माणसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे.