बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (17:59 IST)

*'दिल से अमीर' प्रथमेश ला ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी!*

timepass 3
'हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’असं म्हणत दगडू या भूमिकेतून प्रथमेश सगळ्यांसमोर आला आणि सगळ्यांचा लाडका सुद्धा झाला. याआधी बालक पालक मधून देखील प्रथमेशने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता, पण टाईमपासचा बिनधास्त, टपोरी आणि प्रेमळ दगडू ने त्याला विशेष ओळख मिळवून दिली. त्यानंतर 'दील से अमीर' असलेल्या दगडूने लागोपाठ अनेक चित्रपट लाईन केले. इतकेच नव्हे तर भूवन बाम फेम 'ताजा खबर' या हिंदी वेब सिरीज मध्ये ही त्याला भुमिका मिळाली. 
 
प्रथमेश येत्या काळात 'दृश्यम' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. शिवाय, टाईमपासच्या तिसऱ्या भागात आणि टकाटक चित्रपटाच्याही सिक्वेलमधून तो चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे सर्वश्रूत आहेतच! थोडक्यात काय तर प्रथमेश परबला ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरीच लागली आहे. 
timepass 3
प्रथमेशची अभिनय कारकीर्द अॅक्टींग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या सर्व यूथला प्रेरणादायी आहे, त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे लाखो फोलोव्हर्स देखील आहेत. 
प्रथमेश ने लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या टाइमपास 3 संबंधित एक पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर टाकली आहे. 
"टाईमपास" सिनेमाच्या कथेइतकीच जवळची वाटतात ती या सिनेमातील गाणी. 
अवघ्या महाराष्ट्राला, 'प्रेमाचे वेड' लावणाऱ्या, टाईमपास 1 आणि 2 च्या गाण्यांइतकीच, धमाकेदार गाणी "टाईमपास 3" मध्ये देखील आहेत बरं का!!
आई बाबा आणि साई बाबा शप्पथ....जाम भारीssssssssss वाटलं. 
असंच प्रेम राहू द्या, कारण #Dagadu_is_Back
असे लिहत त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.