मराठी अभिनेत्री केतकी चितळेची तुरुंगातून सुटका, शरद पवारांविरोधात केली होती अपमानास्पद पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. ती आज ठाणे कारागृहातून बाहेर आली आहे. जिल्हा न्यायाधीश एचएम पटवर्धन यांनी त्यांना 20,000 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. चितळे यांना 14 मे रोजी मराठी कविता शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये पवारांचा अपमानास्पद उल्लेख करण्यात आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना चितळे यांनी योग्य वेळी बोलेन असे सांगितले. त्यांनी बहुतांश प्रश्नांची उत्तरे जय हिंद, जय महाराष्ट्र अशी दिली.
आंबेडकर युवा संघाचे सदस्य स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीवरून नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री चितळे यांच्या विरोधात 30 मार्च 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार एका फेसबुक पोस्टशी संबंधित होती. या पोस्टमुळे राजकीय पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारदार स्वप्नील यांनी केला होता. 14 मे 2022 रोजी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारी कविता फेसबुकवर शेअर केल्याबद्दल चितळे यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती.
त्यांच्यावर सार्वजनिक गैरव्यवहार, बदनामी आणि विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणे या कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. 29 वर्षीय अभिनेत्रीवर फेसबुक पोस्टच्या संदर्भात 20 हून अधिक एफआयआर दाखल आहेत. गेल्या आठवड्यात एका प्रकरणात न्यायालयाने चितळे यांना जामीन मंजूर केला होता.