शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (19:23 IST)

दगडी चाळ 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रुपेरी पडद्यावर अवतरणार

मुंबईवर आपली सत्ता प्रस्थापित करू पाहणार्‍या अरुण गवळी आणि त्यांचे सुरक्षा कवच असलेली दगडी चाळ आपल्या सर्वानाच माहीत आहे. पण गँगवॉर्समध्ये अडकलेल्या मुंबईत हा वाम मार्ग तेव्हा काही सगळ्यांनीच राजीखुशीने निवडला नव्हता. अशाच प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने या प्रवाहात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्यावर चित्रित झालेला मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेला अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता अंकुश चौधरी अभिनित दगडी चाळ हा रंजक मराठी चित्रपटप्रेक्षकांच्या भेटीला  2 ऑक्टोबर 2015 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळाली.दगडी चाळीचा थरार दाखवणारा 'दगडी चाळ' चित्रपट आला होता. त्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता या चित्रपटाचा दूसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतीच त्याची तारीख जाहीर करण्यात आली. 
 
आता या चित्रपटाचे सिक्वल म्हणजे दुसरा भाग दगडी चाळ2  देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चुकीला माफी नाही' असं म्हणणाऱ्या अरुण गवळींचा ( Arun Gawli) म्हणजे डॅडींचा ( Daddy) दबदबा पुन्हा एकदा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दगडी चाळ चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे (makarand deshpande) यांनी अरुण गवळींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातही मकरंद देशपांडेच अरुण गवळींच्या भूमिकेत आहेत. पूजा सावंतने दगडी चाळ 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. संगीता अहिर प्रदर्शित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून अभिनेता अंकुश चौधरी (ankush chaudhari) आणि मकरंद देशपांडे यांनी चित्रपटाचा टीझर शेयर केला आहे.येत्या18 ऑगस्टला 'दगडी चाळ 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 
या टीझर मध्ये भर पावसात तुडुंब भरलेल्या गर्दीतून अरुण गवळी एंट्री घेत आहेत असं दाखवण्यात आले आहे.
 टिझरला एक सुंदर कॅप्शन दिले आहे, 'डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव म्हणजे दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’,  चित्रपटाच्या पहिल्या भागात अंकुश आणि अभिनेत्री पूजा सावंत (pooja sawant) हिची केमिस्ट्री प्रेक्षकांनी अनुभवली. विशेष म्हणजे 'दगडी चाळ 2' मधेही अंकुश आणि पूजा आपल्या भेटीला येणार आहेत.  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.