शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 जून 2022 (09:11 IST)

वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेचा ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला

ketki chitale
वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेचा ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात 2020 साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
 
पोलीस महासंचालकांना सात दिवसाच्या आत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 17 जून रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेशही महिला आयोगाने दिले आहेत. नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने न्यालयीन कोठडी सुनावली होती. तर कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तिचा मुक्काम ठाणे कारागृहातच राहणार आहे.