अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात वारकरी आक्रमक;देहू संस्थानने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून सध्या तिला अटक करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची 'तुका म्हणे 'ही स्वाक्षरी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमध्ये तिचा वापर केल्याने केतकीवर देहू संस्थानने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हिला 14 मे रोजी अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह फेसबुकवर पोस्ट केल्या प्रकरणी तिला अटक करण्यात आली असून आता तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे या शब्दांचा वापर केल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पात्र देहू संस्थान ने पिंपरी -चिंचवड पोलिसांना दिले आहे.
संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असून तिने तुका म्हणे असे शब्द वापरून वादग्रस्त लिखाण केले आहे. तुका म्हणे ही त्यांची नाममुद्रा असून त्यांच्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे. कोणीही कोणत्याही संतांचे साहित्य अशा प्रकारच्या विटंबना करणाऱ्या साहित्यात वापरू नये आणि केतकी ने याचा वापर केल्या प्रकरणी तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देहू संस्थान ने केली आहे.