शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 15 मे 2022 (10:01 IST)

भाजपच्या प्रवक्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण?

पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे. पुण्यातील त्यांच्या कार्यालयात घुसून ही मारहाण केली आहे.
 
दोन दिवसांपूर्वी विनायक आंबेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती असा आरोप करण्यात आला. त्याविरोधात त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.

यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. यामुळे आता पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद चिघळण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, विनायक आंबेकर यांनी आपल्या कवितेतल्या ओळी मागे घेतल्या असून माझ्या कवितेत मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कुणाबाबत वाईट चिंतन करण्याची संस्कृती भाजपची नसल्याचंही त्यांनी म्हटलं.