पोटच्या मुलाला दोन वर्षे 22 कुत्र्यांसोबत खोलीत डांबलं
पुण्यातील कोंढवा भागात एका आई-वडिलांची निर्दयता समोर आली आहे ज्यात त्यांनी आपल्या 11 वर्षांच्या मुलाला दोन वर्ष एका खोलीत 22 कुत्र्यांसोबत डांबून ठेवलं. या प्रकरणी आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालकल्याण समितीच्या निणर्ययावर त्याच्या पालकांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
संजय लोधरिया आणि शितल लोधरिया अशी या आरोपी माता-पित्याची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरातील कृष्णाई इमारतीमध्ये संजय लोधरिया आणि शितल लोधरिया राहतात. ते राहत असलेल्या घरात 20 ते 22 कुत्रेदेखील राहतात. धक्कादायक बाब म्हणणे संजय आणि शितल यांनी आपल्या 11 वर्षांच्या मुलाला या 22 कुत्र्यांसोबत दोन वर्ष खोलीत डांबलं होतं. हा मुलगा खिडकीत बसून कुत्र्यासारखं वर्तन करायचा.
सोसायटीतील जागरुक रहिवाशांनी या मुलाच्या दुर्दशेबद्दल ज्ञानदेवी चाइल्ड लाइनच्या अनुराधा सहस्त्रबुद्धे यांना कल्पना दिली. त्यानुसार त्यांच्या पथकाने या घराला भेट दिली. या वेळी त्यांनी मुलाच्या पालकांची कानउघाडणी केली मात्र दुसर्या दिवशी पथक पुन्हा आले असता घराला कुलुप लावलेले होते. खिडकीतून डोकावून बघितले तर मुलगा कुत्र्यांमध्ये बसलेला होता.
ही सर्व भटकी कुत्री होती आणि त्यांनी खोलीत बरीच घाण करुन ठेवली होती. विचारपूस केल्यावर पालकांनी सांगितले की कुत्र्यांच्या प्रेमापोटी आमचे लग्न झाले त्यामुळे आम्ही कुत्री पाळली. त्यांच्यासोबतच राहतो. आणि कोरोनामुळे मुलाला घरात ठेवतो.
पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक करुन 11 वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.